10 वर्षाचा राज गणितात कच्चा आहे, पण मोबाईल छान वापरतो याचं पालकांना कौतुक आहे.
13 वर्षाची नीला Instagram वर खूप अॅक्टिव आहे. दीपिका ला फॉलो करते ती याची घरात चर्चा आहे.
17 वर्षाचा नीलेश चे 500 फॉलोवर आहेत. दिवसभर तो SnapChat आणि Insta वर असतो.
खरं तर प्रत्येक पिढी मध्ये एक गोष्टी अशी येते, जी सगळ्या पालकांना घाबरवून सोडते, की यामुळे आपली मुलं बिघडतील. सुरुवातीला रेडियो होता, मग सिनेमा, मग टीव्ही. या शतकाच्या सुरुवातीला तर नव्याने आलेले channel व cartoon network सारख्या गोष्टी तर धुमाकूळ घालून गेल्या. टीव्ही, cartoon व मॅच यांची भीती इतकी बसली की परीक्षा आल्या की केबल काढून टाकणे हे अगदी नियम असल्यासारखं केलं जाऊ लागलं.
आज तशीच काहीशी परिस्थिति मोबाईल, सोशल मीडिया या सगळ्या साधनांची आहे. पण सोशल मीडिया आणि टीव्ही सारख्या गोष्टी एकाच तराजूत ठेवता येतील का?
पूर्वीची आणि आत्ताची माध्यमे: फरक तो काय? ( 1 - Impact of different social media on child psychology and parenting)
वरवर पहिलं, तर टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर या सगळ्या गोष्टी सारख्याच दिसतात. पालकांना फक्त यामुळे मुलांचा वेळ जातो, अभ्यास मागे पडतो या गोष्टी दिसतात जे खरंच आहे. मात्र काही गोष्टी अशा आहेत, ज्याचा प्रत्येक पालकांनी बारकाईने विचार करावा:
पूर्वीची माध्यमे सोबत वापरण्याची होती, जसे टीव्ही, रेडियो, पेपर, फोन. घरात एकच टीव्ही किंवा रेडियो असे, जो सगळ्या लोकांसोबत वाटून घ्यावा लागत असे. त्यामुळे तडजोड करणे, आपली वेळ येईपर्यंत थांबणे या गोष्टी आपोआप शिकल्या जात असत.
पूर्वीची माध्यमे पब्लिक होती. म्हणजेच, टीव्ही लावला, किंवा रेडियो लावला की त्याचा आवाज किंवा चित्र घरातील सगळ्यांना दिसत असे. या माध्यमात अजिबात काही खाजगी बाब, किंवा गुप्तता (privacy, confidentiality) अशा गोष्टी नव्हत्या. त्यामुळे टीव्ही वर कोण काय बघत आहे हे सर्वांना कळत असे. फोन वाजला तरी तो सगळ्यांना कळत असे, व व्यक्तीला त्या खोलीत येऊन सगळ्यांसमोर फोन वर बोलावे लागत असे.
ही माध्यमे बहुतेक वेळेस बैठकीच्या खोलीत असत, व ती सगळ्यांनी मिळून बघायची असा अलिखित नियम असे. त्यामुळे टीव्ही वर मॅच बघणे, किंवा एखादी मालिका पाहणे हा एक सोहळा असे.
आजची माध्यमे या कसोटीवर उतरत नाहीत. ती पूर्णपणे खाजगी झालेली आहेत. घरात टीव्ही वर एखादी मालिका सुरू असेल, व जर ती तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही मोबाईल वर दूसरा चॅनल लावून दुसरी मालिका किंवा मंतच पाहू शकता. माध्यमे खाजगी झाल्यामुळे त्यात आपोआप एक गुप्तता आली. प्रत्येकाचा मोबाईल हा सुरक्षित व “त्याचा” असल्याने त्यात कोणाचे नंबर आहेत, तो कोणाशी बोलतो, ती कोणसोबत chat करते हे पाहण्याची सोय राहिली नाही. अर्थात, या पद्धतीचे फायदे आहेत, जे आपल्याला हवेसेच आहेत. मात्र मुलांच्या हातात ही माध्यमे देताना, काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे:
मुले मोठी होत असताना, संवेदनशील असतात, तसेच संस्कारि वयात असतात. छोट्या छोट्या गोष्टींचा मोठा प्रभाव त्यांच्या वर पटकन पडत असतो. तसेच, मोठ्या माणसांपेक्षा मुले पटकन आपली मते, आवडी, सवयी किंवा दृष्टिकोण बदलू शकतात.
वयाच्या काही ठराविक टप्प्यावर येईपर्यंत मुलांना योग्य-अयोग्य, चांगले वाईट या कल्पना, आजूबाजूचे वास्तव, चांगली वाईट माणसे यांचा अनुभव तितका आलेला नसतो. त्यामुळे काय योग्य, काय अयोग्य हा निर्णय ती घेऊ शकतीलच असे नाही.
सुरुवातीच्या काळात, चांगले दिसणे/आवडणे म्हणजेच योग्य असणे अशा पद्धतीने मुले विचार करत असतात. नैतिक, किंवा तर्क लावून विचार करणे मुलांना एका ठरविक वय झाल्यानंतर जमते.
एका ठराविक वयात (developing psychology in child) मुले आपला आदर्श, किंवा रोल मॉडेल शोधत असतात. बहुतांश वेळेस, हे रोल मॉडेल त्यांच्या साठी त्यांचे पालक (parenting role - model), आजी-आजोबा, मित्र किंवा जवळचे नातेवाईक (social circle) असतात. मात्र, पौगंड अवस्थेत येताना, वयात येताना हे रोल मॉडेल हळू हळू बदलतात. बाहेरील जग, स्वातंत्र्य, काहीशी बंडखोरी, सौंदर्य या गोष्टीच अगदी नैसर्गिक आकर्षण मुलांना वाटू लागतं.
या सगळ्या गोष्टींचा (child psychology concerns) विचार केला, तर सोशल माध्यमे (social media) मुलांना देताना त्याचे परिणाम काय होऊ शकतात (parenting role) हे पाहणे गरजेचे आहे:
हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे, की माध्यमे वाईट नाहीत. त्यांचा चुकीचा वापर, किंवा चुकीच्या वेळी केलेला वापर हा गैर आहे.
सोशल माध्यमे, त्यावरील online शिकण्याचे पर्याय, स्त्रोत, हे मुलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. या चॅनल मध्ये, गणितापासून ते घरातील फ्रीज कसा दुरुस्त करावा, कपड्याची घडी पटकन कशी करावी यासारखे लाखों जीवनास उपयोगी गोष्टी शिकवणारे चॅनल व handles आहेत जी मुलांसाठी नक्की उपयोगी ठरू शकतील.
आज, content creator, graphic designer, social media manager, आयटी Cell manager या व अशा हजारो नोकऱ्या व व व्यवसाय सोशल मीडिया वर अवलंबून आहेत, जे करण्याची प्रेरणा मुलांना मिळू शकले.
मात्र, हे फायदे मिळत असतानाच, काही धोके सोशल मीडिया व वैयक्तिक मोबाईल यामुळे मुलांना सामना करावा लागू शकतो.
प्रभावशील वयात (impressionable age) असल्यामुळे सोशल मीडिया वरील कुणाचा प्रभाव मुलांवर पडेल, हे सांगणे अवघड आहे. सोशल मीडिया वर जसे चांगले शिक्षक, डॉक्टर, शास्त्रज्ञ, खेळाडू, कलाकार, कर्मचारी आहेत, तसेच अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या मुलांनी ठराविक वयात पाहू नयेत.
सोशल मीडिया वरील content बऱ्याच वेळेस chota असतो, कमीत कमी वेळेत माहिती मिळावी यासाठी बनवलेला असतो. त्यामुळे सोशल मिडियातून मिळणारी माहिती ही बऱ्याच वेळेस पूर्ण नसते. माहितीची दुसरी बाजू मांडलेली नसते. या गोष्टी मुलांना समजतीलच असे नाही. बऱ्याच वेळेस त्या मोठ्या माणसांना देखील लक्षात येत नाहीत.
सोशल मीडिया (social media) हे एक आभासी माध्यम आहे. माहिती देणारी व्यक्ती नक्की कोण आहे, हे बऱ्याच वेळेस लपवले जाते, अनेक accounts ही गंमत म्हणून काढलेली (parody accounts) असतात, पुष्कळ accounts ही bots (संगणकाने चालवलेली खोटी accounts) असतात, ज्यांचा हेतु ठराविक माहिती पुढे ढकलत राहणे हाच असतो. मुलांपर्यंत अशी accounts पोहोचणे, व त्यातून चुकीची माहिती मिळणे हे धोकादायक ठरू शकते.
सोशल मिडियात (social media) एखादे बटन दाबणे, लाइक करणे या गोष्टी ठराविक गोष्टी तुम्हाला आवडतात याच्या दर्शक आहेत. तसे केल्याने तुम्ही आपोआप सोशल मीडिया च्या algorhythm मध्ये ओढले जाता. त्या मोहातून बाहेर पडणे अवघड आहे याची जाणीव मुलांना होणे अवघड असते.
सर्वात महत्वाचे: फेसबुक, ट्विटर, instagram वर अकाऊंट काढण्यासाठी वयाची एक मर्यादा आहे, जी 18 वर्षाची आहे. याच्या मागे हेतु हाच आहे, की या माध्यमाचा वापर करणारी व्यक्ती निदान कायद्याने संज्ञान असावी. त्यामुळे, असे अकाऊंट लहान मुलाने काढणे हे मुळातच चुकीचे आहे, व कायद्याच्या दृष्टीने ते उल्लंघन आहे. या गोष्टीचे भान अनेकद पालक (parenting difficulties) व मुले दोघांना राहत नाही. त्यातून निर्माण होणाऱ्या कायदेशीर अडचणी या विशेषत: लहान मुलांसाठी फार त्रासदायक ठरू शकतात. त्याबद्दलची अधिक माहिती पुढील ब्लॉग मध्ये.
Comments